नगराध्यक्षांनाच अशी चेतावणी द्यावी लागत असेल, तर सामन्य जनतेने काय करायचे ? शहरातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी नगराध्यक्षांना उपोषणाची चेतावणी द्यावी लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
सावंतवाडी – सावंतवाडी शहरात व्हिडिओ गेम, क्लब, मटका, जुगार आदी अवैध व्यवसाय चालू आहेत. यामुळे शहरातील युवा पिढी वाया जात आहे. येत्या १५ दिवसांत हे सर्व व्यवसाय बंद करण्यासाठी पोलीस विभागाने लक्ष द्यावे. १५ दिवसांत हे न थांबल्यास स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार, अशी चेतावणी सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे. याविषयी नगराध्यक्ष परब यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना ई-मेल केला आहे.