चारधाम यात्रा स्थगित

उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारचा निर्णय

देहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड सरकारने पुढील आदेश येईपर्यंत चारधाम यात्रा स्थगित केली आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सरकारने चारधाम यात्रेसंदर्भात कोरोनाविषयीची मार्गदर्शक तत्त्वे जारी करत  १ जुलैपासून यात्रा प्रारंभ होईल, असे सांगितले होते. त्यानंतर उत्तराखंड उच्च न्यायालयाने ७ जुलैपर्यंत यात्रेवर बंदी घातली होती.

राज्य सरकारने चारधाम यात्रेसाठी जारी केलेली नियमावली ही कुंभमेळ्यात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची नक्कल आहे. ही यात्रा कुंभमेळ्याप्रमाणे कोरोनाचा संसर्ग पसरवणारी ठरू नये, असे न्यायालयाने याआधी म्हटले होते.