अलवर (राजस्थान) येथे गोतस्करांकडून पोलिसांवर गोळीबार : एक पोलीस शिपाई घायाळ

५ धर्मांध गोतस्करांना अटक

काँग्रेसच्या राज्यात गोतस्कर पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस दाखवतात, हे लक्षात घ्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

अलवर (राजस्थान) – येथील मालाखेडा लक्ष्मणगड चौकामध्ये पोलीस आणि गोतस्कर यांच्यात झालेल्या चकमकीत एक पोलीस घायाळ झाला. या प्रकरणी अलीजान, इताब, मिसरों, लियाकत आणि सद्दाम या ५ गोतस्करांना अटक करण्यात आली आहे. नाकाबंदीच्या वेळी या गोतस्करांच्या वाहनाला पोलिसांनी थांबण्यास सांगितले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर ही चकमक उडाली.