महाराष्ट्राचा लसीकरणात आतापर्यंतचा उच्चांक !
मुंबई – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत २६ जूनला राज्यात ७ लाख २६ सहस्र ५८८ नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे.