‘पितांबरी’ आस्थापनाच्या वतीने कर्मचार्‍यांसाठी कोविशिल्ड लसीकरण शिबिराचे आयोजन !

लसीकरण शिबिराचा लाभ घेतांना कर्मचारी

ठाणे – ‘कोविड १९’ सारख्या घातक रोगांच्या संसर्गाच्या काळात शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पितांबरीच्या वतीने ‘गोपियुष च्युएबल टॅबलेट्स’ आणि ‘कॅपसूल्स’, ‘गुडुची टॅबलेट्स’, ‘आयुष् क्वॉथ टॅब्लेट्स’ अशी वेगवेगळी उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली; मात्र या रोगापासून वाचण्यासाठी लस घेणेही तितकेच आवश्यक आणि अनिवार्य आहे. याविषयीचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’च्या वतीने त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांसाठी येथील सुप्रसिद्ध बेडेकर रुग्णालयाच्या सहयोगाने कोविशिल्ड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ठाण्यातील गोखले रस्त्यावरील पितांबरी कार्यालयात १९ जून या दिवशी हे शिबिर पार पडले. पितांबरीचे ३०० सहकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी शिबिराचा लाभ घेतला. पितांबरीचे उपाध्यक्ष आणि मार्केटिंग डायरेक्टर श्री. परीक्षित प्रभुदेसाई, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. महेश जोशी, बेडेकर रुग्णालयाच्या संचालिका अर्चना बेडेकर आणि श्रुती बेडेकर यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.