रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर जिज्ञासूंनी दिलेला अभिप्राय

सनातन आश्रम, रामनाथी

१. शांत आणि चैतन्यमय आश्रम

‘रामनाथी आश्रमातील वातावरण अतिशय चैतन्यमय आहे. आश्रम स्वर्गासारखा शोभिवंत आहे. आश्रमात अनेक लोक येत असतात. सर्वत्र स्वच्छता आहे. सगळीकडे शांत आणि सुगंधी वातावरण आहे. आश्रमात जागोजागी ‘ॐ’ उमटले आहेत. स्वागतकक्षातील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि भगवान श्रीकृष्णाचे चित्र सजीव झाले आहे.

२. सख्यभावाने रहाणारे साधक

आश्रमात सर्व साधक सख्यभावाने रहातात. कोणतीही चूक होऊ नये; म्हणून सर्व ठिकाणी बारकाव्यानिशी सूचना लिहिलेल्या आहेत आणि तरीही चूक झाली, तर साधक मनाला स्वयंसूचना देतात आणि प्रायश्चित्तही घेतात. सर्व साधकांच्या तोंडवळ्यावर सोन्यासारखी चमक दिसून येते.

३. आश्रमातील नामजप करत केलेला महाप्रसाद पुष्कळ स्वादिष्ट असतो.

४. आश्रमातून जाण्याची मला इच्छाच होत नव्हती. आश्रम इतका सुंदर आहे की, त्याचे मी शब्दांत वर्णन करू शकत नाही.’

– श्री. विनोदकुमार मनोहरलाल काबरा, सांगली रोड, इचलकरंजी. (७.३.२०२०)