सिवान (बिहार) येथील मशिदीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोघे जण घायाळ !

  • पोलीस आरोपी सगीर साईच्या शोधात !

  • बिहारमध्ये गेल्या काही दिवसांत बॉम्बस्फोटाची तिसरी घटना !

देशात धर्मांध आणि जिहादी यांनी बॉम्बस्फोट केल्यावर एकजात पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड बंद ठेवतात; मात्र हिंदूंच्या निरपराध संघटना अन् आणि नेते यांच्यावर आरोप करण्यात मात्र ते सर्वांत पुढे असतात, हे लक्षात घ्या !

बॉम्बस्फोटात घायाळ झालेला मुलगा

सिवान (बिहार) – येथील जुडकन गावातील मशिदीच्या मागे झालेल्या बॉम्बस्फोटात पिता आणि पुत्र घायाळ झाले आहेत. विनोद मांझी आणि त्यांचा ३ वर्षांचा मुलगा सत्यम कुमार अशी या दोघा घायाळांची नावे आहेत. स्फोटाच्या आवाजामुळे येथे गोळा झालेल्या ग्रामस्थांनी या दोघांना रुग्णालयात भरती केली.

विनोद मांझी यांच्या पत्नीने सांगितले की, माझे पती मशिदीच्या मागील बाजूस मुलासमवेत बसले होते. तेव्हा गावातील सगीर साई नावाची व्यक्ती आली आणि तिने माझ्या पतीला एक पिशवी देऊन म्हणाली की, एक घंट्याने एक व्यक्ती येथे येईल, तिला ही पिशवी द्या. तो निघून जात असतांनाच पिशवीमधील बॉम्बचा सफोट झाला. यात माझ्या पती आणि मुलासह सगीर हाही घायाळ झाला.’ सगीर घायाळ झाला असला, तरी तो पसार आहे. पोलीस सगीर आणि ज्याला ही पिशवी द्यायची होती, त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी बिहारच्याच बांका आणि दरभंगा येथेही बॉम्बस्फोट झाले होते. आता ही तिसरी घटना आहे. त्यामुळे पोलीस अधिक सतर्कतेने या घटनेची चौकशी करत आहेत.