सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणाचे दरवाजे उघडले !

उरमोडी धरणाचे दरवाजे उघडले

सातारा, १८ (वार्ता.) – जिल्ह्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून गत २ दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील नाले, ओढे, धबधबे ओसंडून वहात आहेत. त्यामुळे धरण क्षेत्रातही पाण्याची चांगलीच आवक झाली आहे. उरमोडी धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस चालू असल्याने धरणाचे ४ वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत.

१७ जूनच्या रात्री ११ वाजता ०.२५ मीटरने धरणाचे उचलून ७५० क्युसेक्स आणि विद्युत्गृहातून २०० क्युसेक्स असा ९५० क्सुसेक्स विसर्ग उरमोडी धरणातून नदीपात्रात चालू करण्यात आला आहे. १८ जून या दिवशी सकाळी ९ वाजता विसर्ग वाढवण्यात आला असून तो १ सहस्र ५१३ क्युसेक्स करण्यात आला आहे. पावसाचा जोर पहाता सध्या उरमोडी नदीपात्रातून ये-जा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.