१. श्री दुर्गादेवीच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवणे
‘श्री दुर्गादेवीच्या छायाचित्राकडे बघत नामजप करत असतांना तेज आणि छायाचित्रात जिवंतपणा जाणवायचा. नामजप करतांना डोळे बंद केल्यानंतर सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकरताई दिसायच्या. त्या वेळी भावजागृती व्हायची आणि नामजपाची ओढ लागायची.’ – सौ. जयश्री मनवळ
२. नामजप करतांना मूर्तींच्या चरणांवर एक एक पुष्प अर्पण करत आहे, असे जाणवणे
‘नामजप करतांना आरंभी मला प्रयत्नपूर्वक नामजप करावा लागत होता. तेव्हा मी ‘रामनाथी आश्रमात हवन चालू आहे’, हे आठवण्याचा प्रयत्न करत होते. त्या वेळी ‘मी त्या हवनापर्यंत पोचू शकत नव्हते’, असे दिसले. ‘एखाद्या आत्म्याच्या गोळ्याप्रमाणे मी आश्रमासमोरील झाडावर बसून हवन बघत आहे’, असे दिसत होते. त्यानंतर जसजसा प्रतिदिन नामजप करू लागले, तसे नामजपाच्या वेळी रामनाथी आश्रमाच्या ध्यानमंदिरात बसून श्री दुर्गादेवी, दत्त आणि शिव या देवतांच्या मूर्तींच्या चरणांवर एक एक पुष्प अर्पण करत आहे’, असे जाणवले, तसेच मी एका रस्त्याने चालत असतांना माझ्या सभोवती दुर्गादेवी, दत्त आणि शिव यांचा नामजप गोलाकार फिरत आहे’, असे दृश्य दिसत होते.’ – कु. ज्योत्स्ना मनवळ
३. नामजप करत असतांना श्री दुर्गादेवी पुष्कळ मारक रूपात दिसून शिव आणि दत्त ध्यानस्थ अवस्थेत दिसणे
‘नामजप करत असतांना श्री दुर्गादेवी पुष्कळ मारक रूपात दिसली. तिच्या सर्व १८ हातांमध्ये शस्त्रे होती. हवन चालू असलेल्या होमकुंडामध्ये देवी उभी दिसत होती. तिच्याभोवती सर्व काळ्या घोड्यासारख्या आकृती दिसत होत्या. देवी त्यांना मारत होती. शिव आणि दत्त ध्यानस्थ अवस्थेत दिसले. नंतर प.पू. गुरुदेव एका आसंदीत नमस्काराच्या मुद्रेत दिसले. मग पुष्कळ भावजागृती होऊन डोळ्यांतून भावाश्रू आले. नंतर होमाचा अग्नी प्रज्वलित झाला आणि पुन्हा तेच दिसले. त्यात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ तेथे उपस्थित असलेल्या दिसल्या. मलाही ‘मी तिथेच आहे’, असे अनुभवायला मिळाले. एक घंटा नामजप एका लयीत झाला.’ – सौ. मनीषा सोमवंशी
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |