संगीत सदर ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग
१. ‘मुलतानी’ रागाचे गायन ऐकतांना अनाहत चक्राजवळ संवेदना आणि डाव्या हाताला उष्णता जाणवणे
‘५.१२.२०१८ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रदीप चिटणीस यांनी ‘मुलतानी’ राग गायला. ते हा राग गात असतांना आरंभी माझे मन एकाग्र झाले. थोड्या वेळाने मला अनाहत चक्राजवळ संवेदना जाणवू लागल्या. माझ्या अंगावर २ – ३ वेळा रोमांच आले आणि माझ्या डाव्या हाताला दोन वेळा उष्णता जाणवली. गायन संपल्यानंतर मला आलेली अनुभूती मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मुलतानी राग उष्णता वाढवतो.’’
२. ‘भैरव’ रागाचे गायन ऐकतांना परात्पर गुरुदेवांचे दर्शन होणे आणि ‘गायन थांबू नये’, असे वाटणे
५.१२.२०१८ या दिवशी रात्री श्री. प्रदीप चिटणीस यांनी ‘भैरव’ राग गायला. त्या वेळी आरंभी माझ्या मनात नकारात्मक विचार आले; पण नंतर सकारात्मक विचार येऊन माझी पुष्कळ भावजागृती झाली. मला डोळ्यांसमोर सतत परात्पर गुरु डॉक्टर दिसत होते आणि चांगले वाटत होते. श्री. चिटणीस यांनी ‘या रागाचे गायन करणे थांबवू नये’, असे मला वाटत होते. मी दिवसभर अनेक घंटे बसूनही दुसर्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे उठले. त्या वेळी मला एरव्हीपेक्षा हलकेपणा जाणवत होता.’
– सौ. सुजाता अशोक रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१२.२०१८)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |