‘राष्ट्रीय हिंदु वाहिनी संघ’ आणि ‘ज्ञान फाऊंडेशन’ यांनी पोलिसांच्या साहाय्याने केलेल्या संयुक्त कृतीचा परिणाम
|
मडगाव, १४ जून (वार्ता.) – ‘राष्ट्रीय हिंदु वाहिनी संघ’ आणि ‘ज्ञान फाऊंडेशन’ यांनी नुकतीच बाणावली येथे अनधिकृत गोवंशियाची हत्या उघडकीस आणली आहे, तसेच १ बैल आणि २ वासरे यांना जीवदान दिले आहे.
याविषयी अधिक माहिती देतांना ‘राष्ट्रीय हिंदु वाहिनी संघा’चे राष्ट्रीय सचिव श्री. राजीव झा म्हणाले, ‘‘पेड्डा, बाणावली येथे मजीद बेपारी यांच्या निवासस्थानाजवळ एका गोवंशियाची हत्या करण्यात आली. घटनास्थळी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक व्यक्ती १ बैल आणि २ वासरे यांना घेऊन जवळच्या शेतात जात असल्याचे निदर्शनास आले. याविषयी कोलवा पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आल्यावर बैल आणि २ वासरे यांना ‘ज्ञान फाऊंडेशन’कडे सुपुर्द करण्यात आले.’’