कै. (सौ.) सुजाता कुलकर्णी यांच्या मृत्यूत्तर विधींमागील अध्यात्मशास्त्र

सनातनचे नूतन प्रकाशन

ग्रंथमालिका : सनातनच्या साधकांचा साधनाप्रवास

संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

संत-महात्म्यांंच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू असून समाजाला आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या जगभर नैसर्गिक आपत्तींबरोबर ‘कोरोना’महामारीने थैमान घातले आहे. या भीषण काळात समाजासह साधकांनाही खडतर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तीव्र त्रास होत असतांना अतिशय दु:खदायक प्रसंगात मनाने स्थिर राहून साधनारत रहाणे हे मोठे आव्हानच असते. या मालिकेतून खडतर परिस्थितीत स्थिर राहून कसे सामोरे जायचे, हे कळण्यासाठी ‘सनातनच्या साधकांचा साधनाप्रवास’ या मालिकेतील तीन ग्रंथ प्रकाशित झाले असून ते अत्यंत उपयुक्त आहेत. हे सर्वच ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत, ही नम्र विनंती !

ग्रंथाचे मनोगत

सौ. सुजाता कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंबीय यांची साधना असल्यामुळे सौ. कुलकर्णी यांच्या मृत्यूनंतरही देवाची कृपा अनुभवणारे कुलकर्णी कुटुंबीय !

‘प्रत्येकाच्या आयुष्यात ‘जवळच्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणे’, ही घटना केव्हातरी घडतेच. पूर्वी एकत्र कुटुंब असायचे. त्यामुळे कुटुंबियांपैकी एखादा गंभीर दुखण्याने रुग्ण झाल्यास त्याला अन्य कुटुंबीय साहाय्य करायचे. कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सर्व जण एकत्र येऊन मृत्यूनंतरचे विधी करायचे. प्रस्तुत ग्रंथात उल्लेखलेले अंबरनाथ, जि. ठाणे येथील कुलकर्णी कुटुंबीय (श्री. देवदत्त कुलकर्णी, त्यांच्या पत्नी सौ. सुजाता आणि त्यांची कन्या कु. तृप्ती) गेली १० वर्षे सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात येऊन राहिले. त्यांच्यापैकी सौ. सुजाता कुलकर्णी यांचे वर्षभराच्या गंभीर आजारपणानंतर २०.४.२०२० या दिवशी निधन झाले. या ग्रंथात ‘सौ. कुलकर्णी यांच्या मृत्यूला कुलकर्णी कुटुंबियांनी साधकांच्या साहाय्याने कसे तोंड दिले, तसेच कुलकर्णी कुटुंबियांची साधना असल्यामुळे या काळात त्यांनी देवाची कृपा कशी अनुभवली’, हे दिले आहे. सौ. कुलकर्णी यांच्या मृत्यूनंतर, तसेच मृत्यूनंतरच्या विधींच्या वेळी केलेले सूक्ष्म परीक्षणही ग्रंथात दिले आहे. ते वाचून मृत्यूनंतरची सूक्ष्मातील प्रक्रिया कशी असते, हे लक्षात येते. ‘सौ. कुलकर्णी यांची साधना असल्यामुळे त्यांचा मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर झाला’, हे सूक्ष्म परीक्षणातील विवेचनावरून कळते.

‘प्रत्येकाला मृत्यू अपरिहार्य आहे. मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रत्येकानेच जीवनात साधना करणे आवश्यक आहे. ती करण्याची बुद्धी प्रत्येकाला होवो’, ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’ – संकलक

ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील छायाचित्र


सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com