हिंगोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांकडून पक्षाच्या सभापतींवरच मताधिक्याने अविश्‍वास ठराव पारित !

हिंगोली जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य

हिंगोली – येथील जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावर ९ जून या दिवशी दुपारी ३५ विरुद्ध ० मतांनी अविश्‍वास ठराव पारित झाला आहे. या वेळी १५ सदस्य मात्र अनुपस्थित होते. या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका संदिग्ध असल्याची चर्चा चालू आहे. अविश्‍वास ठरावावर चर्चा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सदस्यांची बैठक झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश नवघरे म्हणाले की, शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावर अविश्‍वास ठराव पारित होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता; मात्र ते ऐकण्याचा मनःस्थितीत नव्हते. इतर सदस्यही त्यांच्या पाठीशी होते. त्यामुळे संदिग्ध भूमिका घेतली म्हणणे योग्य ठरणार नाही.