गायिका सौ. देवश्री भार्गवे यांनी गायलेला राग मुलतानी आणि त्याची सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

२१ डिसेंबर २०१९ या दिवशी गायिका सौ. देवश्री भार्गवे यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संगीताविषयीच्या संशोधनामध्ये सहभागी होऊन रागगायन केले. तेव्हा त्यांनी राग मुलतानी गायला. या रागाची मला जाणवलेली आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये येथे देत आहे.

गायनसेवा सादर करतांना सौ. देवश्री भार्गवे

१. आरंभी माझी सूर्यनाडी कार्यरत होती.

२. मुलतानी रागगायनाला आरंभ झाल्यावर मला माझ्या अनाहतचक्रावर स्पंदने जाणवू लागली. त्यानंतर २ – ३ मिनिटांतच मला मणिपुरचक्रावर स्पंदने जाणवू लागली. तेव्हा माझी चंद्रनाडीही कार्यरत झाली.

३. मुलतानी रागाची स्पंदने शक्तीच्या स्वरूपात जाणवली. तेव्हा माझ्या पोटामध्ये थोडी उष्णता जाणवत होती.

४. रागाची स्पंदने पूर्णपणे मणिपुरचक्रावर जाणवू लागल्यावर माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

५. हा राग मनाला शांत करणारा आणि ध्यानावस्थेत नेणारा आहे.

६. मुलतानी रागामध्ये जाणवलेली पंचतत्त्वे आणि देवतांची तत्त्वे

वरील सारणीवरून लक्षात येते की, हा राग मुख्यत्वे तेजतत्त्वाशी संबंधित आहे. त्यामुळे शरिराच्या मणिपुरचक्रावर स्पंदने जाणवली.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.