गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तरी ती अल्पच ।

साधकांना मोक्षप्राप्तीची वाट दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले
कु. जागृती महादेव होनमोरे

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मिळाला दैवी बालकांना जन्म ।
पृथ्वीवर रामनाथीमध्ये बनवला वैकुंठ लोक ।। १ ।।

त्याच वैकुंठात रहाते माझी गुरुमाऊली आणि संत ।
कलियुगात दाखवूनी सर्व साधकांना साधनामार्ग ।। २।।

गुरुमाऊली हे साक्षात् श्रीहरीचे रूप ।
पृथ्वीवर येऊनी साधकांना बनवले संत ।। ३।।

वाट दाखवूनी आम्हास मोक्षप्राप्ती करण्यासाठी ।
आणि करण्यास सांगती ईश्वरप्राप्ती ।। ४ ।।

साधकांतून घडवले आता शंभरहून अधिक संत ।
गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तरी ती अल्पच ।। ५ ।।

​‘हे गुरुमाऊली, ‘तुम्हीच ही कविता सुचवलीत आणि लिहून घेतलीत’, त्यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. जागृती महादेव होनमोरे (वय १२ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.७.२०२०) ​

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक