महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील श्रीरामाचा नामजप ऐकतांना आलेल्या अनुभूती

‘५.८.२०२० या दिवशी श्रीराम जन्मभूमीचा शिलान्यास सोहळा होता. त्या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ’श्रीरामा’चा नामजप साधकांना ऐकवला. त्या ऐकतांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कु. तेजल पात्रीकर

१. ‘कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील श्रीरामाचा नामजप ऐकतांना मला वेगळाच आनंद झाला आणि ‘हा जप करतच रहावा’, असे मला वाटले.’- सौ. सिमंतिनी बोर्डे, संभाजीनगर

२. ‘घरात श्रीरामाचा जप लावला होता. हा जप ऐकताच मला शांत वाटून आनंद झाला. हा जप लावल्यावर घरात चांगली स्पंदने निर्माण झाली. ‘मी एका क्षणात या जपाच्या आत शिरलो आहे,’ असे मला वाटले.’ – श्री. सुधीर बोर्डे, संभाजीनगर (७.८.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक