सांगली, २ जून – गेली दीड वर्षे ‘ॲपेक्स कोव्हिड हॉस्पिटल’मध्ये अनेक रुग्णांवर चुकीचे उपचार केल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील आधुनिक वैद्यांवर यापूर्वी फौजदारी गुन्हे नोंद असून सांगली महापालिकेनेही रुग्ण आणि प्रशासन यांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. हे सर्व पुरेसे नसल्याने ‘ॲपेक्स कोव्हिड हॉस्पिटल’मधील आधुनिक वैद्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा आणि या रुग्णालयाची नोंदणी रहित व्हावी, या मागणीचे निवेदन भाजपचे संघटन सरचिटणीस श्री. दीपक माने यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका उपायुक्त राहुल रोकडे, पोलीस अधीक्षक, गांधी चौकी येथील पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.