कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे खडतर जीवन अन् साधनाप्रवास

ग्रंथमालिका : सनातनच्या साधकांचा साधनाप्रवास

  • सनातनचे नूतन प्रकाशन

  • लेखन : श्री. देवदत्त, कै. (सौ.) सुजाता आणि कु. तृप्ती कुलकर्णी

  • संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

संत-महात्म्यांंच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू असून समाजाला आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या जगभर नैसर्गिक आपत्तींबरोबर ‘कोरोना’महामारीने थैमान घातले आहे. या भीषण काळात समाजासह साधकांनाही खडतर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तीव्र त्रास होत असतांना अतिशय दु:खदायक प्रसंगात मनाने स्थिर राहून साधनारत रहाणे हे मोठे आव्हानच असते. या मालिकेतून खडतर परिस्थितीत स्थिर राहून कसे सामोरे जायचे, हे कळण्यासाठी ‘सनातनच्या साधकांचा साधनाप्रवास’ या मालिकेतील तीन ग्रंथ प्रकाशित झाले असून ते अत्यंत उपयुक्त आहेत. हे सर्वच ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत, ही नम्र विनंती !

ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील छायाचित्र

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी संवाद साधतांना कु. तृप्ती कुलकर्णी, श्री. देवदत्त कुलकर्णी आणि सौ. सुजाता कुलकर्णी

ग्रंथाचे मनोगत

१. अनेक त्रास असूनही श्री. आणि सौ. कुलकर्णी यांनी ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठणे

‘श्री. देवदत्त कुलकर्णी माझ्याकडे वर्ष १९९४ च्या शेवटी मानसोपचारांसाठी आले. तेव्हा ते ५२ वर्षे वयाचे होते. ते नास्तिक होते. भेटीनंतर १ – २ मासांतच त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे नामजप करण्यास आरंभ केला. त्यांच्या पत्नी सौ. सुजाता कुलकर्णी यांची तेव्हा कर्मकांडानुसार साधना चालू होती. सौ. कुलकर्णी यांना त्यांच्या मृत्यूपर्यंत तीव्र शारीरिक त्रास, मृत्यूपूर्वी १ वर्ष तीव्र मानसिक त्रास; श्री. कुलकर्णी यांना १० वर्षे तीव्र मानसिक त्रास आणि त्यांची कन्या कु. तृप्ती हिला जन्मतःच तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्या प्रसंगांत कुलकर्णी कुटुंबियांनी त्याला कसे तोंड दिले, हे सर्वांना या ग्रंथातून शिकता येईल. एकाच कुटुंबातील तिघांनाही अनेक वर्षे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तीव्र त्रास असूनही त्यांनी साधना केली. नास्तिक असूनही साधना केल्यामुळे श्री. देवदत्त कुलकर्णी यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे, तर तीव्र अडचणींमध्येही साधना केल्यामुळे सौ. सुजाता कुलकर्णी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.’

२. खडतर जीवनाविषयी तृप्ती कधी कुणाशी बोललेली नसल्याचे कौतुकास्पद असणे

‘कु. तृप्ती कुलकर्णी हिच्या आईने तृप्तीचा जन्म, शिक्षण, तिचा लहानपणापासूनचा स्वभाव, तिला झालेले वाईट शक्तींचे विविध त्रास आणि तिचे मृत्यूयोग इत्यादींच्या संदर्भात या ग्रंथात जी माहिती दिली आहे, ती एकमेवाद्वितीय अशी आहे. सनातनच्या सहस्रो साधकांत एकानेही तृप्तीसारखे अत्यंत खडतर जीवन अनुभवलेले नाही. त्या खडतर जीवनाविषयी तृप्ती कधी कुणाशी बोललेलीही नाही. यासाठी कुणालाही तिचे कौतुक करावेसे वाटेल !

३. लिखाणातील बहुतेक भाग त्रासांसंदर्भात असूनही संपूर्ण लेख वाचायला आरंभ केल्यापासून शेवटपर्यंत अतिशय जिज्ञासेने वाचला जाणे

तृप्ती इतकेच तिच्या आईचेही कौतुक करावेसे वाटते; कारण त्यांनी लिहिलेला लेख वाचतांनाही आपल्याला वाईट वाटते. तिच्या आईने त्यातील प्रत्येक अतिशय दु:खदायक असा प्रसंग स्वत: अनुभवलेला आहे. प्रसंग लिहितांना त्या मनाने जशा स्थिर होत्या, तशा प्रसंग घडत असतांनाही मनाने स्थिर होत्या. त्यांनी लिहिलेल्या या लेखाची भाषाही एखाद्या मोठ्या लेखकासारखी उत्स्फूर्त आणि सहज आहे. त्यामुळे लिखाणातील बहुतेक भाग त्रासांसंदर्भात असूनही संपूर्ण लेख वाचायला आरंभ केल्यापासून शेवटपर्यंत अतिशय जिज्ञासेने वाचला जातो.

साधना करणार्‍या प्रत्येक साधकाच्या जीवनात न्यून-अधिक तीव्रतेचे दु:खद प्रसंग येतात. तृप्तीच्या आईने लिहिलेल्या प्रसंगांतून सर्वांनाच ‘अतिदु:खदायक प्रसंगांना कसे तोंड द्यायचे ?’, हे शिकता येईल. ‘इतरांना हे शिकवणारी तृप्ती आणि तिची आई यांची उत्तरोत्तर जलद गतीने प्रगती होवो’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’  – संकलक

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी

SanatanShop.com

संपर्क  : ९३२२३ १५३१७

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.