फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला !

रश्मी शुक्ला

मुंबई – फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. फोन टॅपिंग प्रकरणात बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यासाठी अनुमती दिल्यानंतर सायबर सेलने त्यांचा जबाब नोंदवला; मात्र यात शुक्ला यांनी सर्व आरोप फेटाळून लावल्याचे सांगितले जात आहे.

फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल लीक केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांना सायबर पोलिसांनी समन्स बजावले होते. त्यानंतर कोरोनाचे कारण देत शुक्ला यांनी चौकशीला येण्यास नकार दिला होता. कारवाई टाळण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना दोन वेळा सायबर सेलच्या चौकशीला उपस्थित रहाण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आला.