राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण पूर्णपणे बंद ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राजेश टोपे

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांच्या एकूण सरासरीपेक्षा १८ जिल्ह्यांत रुग्णवाढीचा वेग अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील गृहविलगीकरण पूर्णपणे बंद करून कोविड केंद्र वाढवण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आली आहे.

या जिल्ह्यांत यापुढे कोविड केंद्रांमध्येच उपचार होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २५ मे या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील कोरोनाच्या संसर्गाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी वरील माहिती पत्रकारांना दिली.