ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करत नाहीत !

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्‍च भाषसे ।
गतासूनगतासूंश्‍च नानुशोचन्ति पण्डिताः ॥

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ११

अर्थ : हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तीवाद करतोस; परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करत नाहीत.