वाईट शक्तींनी मनुष्याचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करून त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार घालून त्याचा सहज अंत घडवून आणणे अन् अशा सूक्ष्म वाईट शक्तींवर नियंत्रण आणणे पुष्कळ कठीण असणे !
वरवर पहाता आपण आत्महत्यांमागे नैराश्य, ताण आदी मनोविकारांशी निगडित कारणे दिसतात; परंतु हे वरवरचे झाले. हे स्थुलातून आपण निरीक्षण करू शकतो; परंतु असे का होते. ताण किंवा निराशा अनेक जणांना येते; पण सर्व जण टोकाचा निर्णय घेत नाहीत. याचाच अर्थ येथे आणखी कुठला तरी घटक कार्यरत आहे.
विविध मनोविकार पाश्चात्त्यांनी शोधून काढले आहेत. ते चुकीचे आहेत, असे नाही; परंतु ते बुद्धीच्या स्तरावरील वरवर दिसणारे कारण आहे. अध्यात्मशास्त्रानुसार आत्महत्येमागे सर्वांत मोठे आणि मूळ कारण आहे, ते म्हणजे वाईट शक्तींचा प्रभाव !
गेल्या काही वर्षांत अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी आत्महत्यांची ३ ते ४ वृत्ते हमखास येतात, असे लक्षात येते. सध्या काळानुसार वाईट शक्तींचा जोर एवढा वाढला आहे की, त्या आता आजारपण, हत्या, मारामारी, गोळीबार आणि बॉम्बस्फोट या माध्यमांच्या साहाय्याने मनुष्याचा जीव घेण्यापेक्षा अतिशय सोपा मार्ग अवलंबत आहेत. त्यांनी मनुष्याचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करण्यास आरंभ केला आहे. वाईट शक्ती निराशा किंवा ताण यांनी अगोदरच कमकुवत झालेल्या मनात काहीही कारण नसतांना आत्महत्येचा विचार घालून त्याचा सहज अंत घडवून आणतात. आपण समोरून येणार्या बंदुकीच्या गोळीपासून वाचण्याचा प्रयत्न करू; पण मनुष्याचे मन आणि बुद्धी यांवर संपूर्ण नियंत्रण मिळवून घातपात घडवून आणणार्या सूक्ष्म आसुरी शक्तींवर नियंत्रण मिळवणे पुष्कळ कठीण आहे.
स्वतःचा जीव संपवणे ही काही सामान्य आणि सोपी गोष्ट नाही; परंतु वाईट शक्तीच्या प्रभावाखाली आलेल्यांना काही वेळा वाईट शक्ती इमारतीवरून उडी मारणे, रेल्वेरुळावर जाणे, विहिरीत किंवा नदीत उडी मारणे आदी गोष्टी करण्यास प्रवृत्त करतात. अशा व्यक्तींचा लिंगदेह कह्यात घेणे हा त्यांचा उद्देश असतो. त्यामुळे आत्महत्या केलेल्या लिंगदेहाला गती मिळणे कठीण जाते.
– श्री. दिवाकर आगावणे, चेन्नई, तमिळनाडू. (२८.५.२०१५)
|