पणजी – गोव्यात दळणवळण बंदीनंतर दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात घट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. २० मे या दिवशी ४४ रुग्णांचा मृत्यू झाला. यांपैकी गोमेकॉमधील २२, तर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनामृतांची संख्या २ सहस्र २७२ झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ४ सहस्र ५८१ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १ सहस्र ५८२ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३४.५३ टक्के झाले आहे. दिवसभरात २ सहस्र ६९४ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित १८९ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून २० सहस्र ८०८ झाली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > गोवा > गोव्यात गेल्या २४ घंट्यांत ४४ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ५८२ नवीन रुग्ण
गोव्यात गेल्या २४ घंट्यांत ४४ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ५८२ नवीन रुग्ण
नूतन लेख
जगातील २६ टक्के लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नाही !
केवळ हिंदूंचे सण आल्यावरच कोरोनाची कशी आठवण होते ? – नितेश राणे, आमदार, भाजप
२९६ रोग वगळून ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ नव्याने येणार !
‘मास्क घालावा कि नाही ?’ – शासनाची भूमिका २३ मार्चला विधीमंडळात स्पष्ट होणार !
गोव्यात ‘एच् ३ एन् २’बाधित २ रुग्ण : सामाजिक स्वच्छता सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
केसतोड (गळू) या विकारावर सोपा घरगुती उपचार