|
|
अमरावती – पोलीस आयुक्तालयाच्या अपराध शाखा दल आणि अन्न-औषध प्रशासन विभाग यांच्याकडून शहरात रात्रभर धाडसत्र राबवण्यात आले. त्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शनचा होणारा काळाबाजार उघड करून १२ इंजेक्शने कह्यात घेण्यात आली. यांपैकी २ इंजेक्शनचे बॅच क्रमांक स्थानिक सामान्य जिल्हा रुग्णालयातील सरकारी कोट्यातील साठ्यातील इंजेक्शनशी जुळले आहेत. त्यामुळे अन्वेषण अधिकार्यांनी ही इंजेक्शने सरकारी कोट्यातील असण्याची शक्यता वर्तवली आहे. ही इंजेक्शने सामान्य जिल्हा रुग्णालयामधून जिल्ह्यातील तालुका स्तरावरील सरकारी कोविड सेंटरमध्ये भरती असलेल्या रुग्णासाठी पाठवली जात होती.
या प्रकरणी सुपर कोविड रुग्णालयातून वॉर्डबॉय शुभम सोनटक्के आणि शुभम किल्लेकर यांना कह्यात घेण्यात आले. त्यांच्या झालेल्या चौकशीतून प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. अक्षय राठोड आणि सुपर कोविड रुग्णालयामधील परिचारिका पूनम सोनवणे, लॅब असिस्टंट अनिल पिंजरकर आणि तिवसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. पवन मालसुरे यांना कह्यात घेऊन त्यांच्याकडून ती १२ इंजेक्शने जप्त करण्यात आली. या प्रकरणी अधिक अन्वेषण चालू आहे.
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत. पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : [email protected] |