सोलापूर महापालिका क्षेत्रात प्रवेश करणार्‍यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी अहवाल बंधनकारक

प्रातिनिधिक छायाचित्र

सोलापूर – शहरातील किराणा, भाजी, फळे, मांस विक्रीची दुकाने १५ मेपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू असणार आहेत, असे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले. उर्वरित सर्व दुकाने १ जूनपर्यंत बंद असणार आहेत, तसेच सोलापूर महापालिका हद्दीत प्रवेश करणार्‍या प्रवाशांना मागील ४८ घंट्यांपूर्वी केलेला ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचा ‘निगेटिव्ह’ अहवाल दाखवणे बंधनकारक असणार आहे.

मालवाहतूक करणार्‍या वाहनांविषयी एकाच वेळी वाहनांमध्ये दोन व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवास करता येणार नाही. ही वाहने राज्याबाहेरील असल्यास त्यांनी राज्यात प्रवेश करण्यापूर्वी ४८ घंटे आधी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल दाखवणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र ७ दिवसांसाठी वैध असणार आहे.