आंध्रप्रदेशातील धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवणारे खासदार रघुराम कृष्णम् राजू यांचा पोलीस कोठडीत छळ !

  • आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या राज्यात याहून वेगळे काय घडणार ? याचा देशातील हिंदुत्वनिष्ठांनी संघटितपणे वैध मार्गाने विरोध केला पाहिजे !
  • सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसच्या राज्यात चालू असलेल्या हिंदूंच्या धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवणार्‍या पक्षातील खासदराचा असा छळ होत असेल, तर तेथील सामान्य हिंदुत्वनिष्ठांचे भवितव्य काय आहे, याचा विचारही न केलेला बरा !
डावीकडून खासदार रघुराम कृष्णम् राजू

अमरावती (आंध्रप्रदेश) – सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसचे बंडखोर खासदार रघुराम कृष्णम् राजू यांना अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजू यांना कथित देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आल्यावर त्यांच्या अधिवक्त्यांनी आरोप केला की, कोठडीमध्ये पोलिसांकडून थर्ड डिग्रीचा वापर करण्यात आला. त्यामुळे आता त्यांना नीट चालताही येत नाही. काही मासांपूर्वीच त्यांच्यावर बायपास शस्त्रकर्म करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची आता वैद्यकीय तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. राजू यांनी जातीजातींत आणि धर्मांत तेढ निर्माण करणारे कथित वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या गुप्तचर विभागाने त्यांना अटक केली होती.

ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात आवाज उठवणारे रघुराम कृष्णम् राजू !

१. कृष्णम् राजू आंध्रप्रदेशात धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. आंध्रप्रदेशमधील तिरुपती तिरुमला देवस्थान मंडळाने मंदिराची दागिन्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा राजू यांनी त्याला विरोध केला होता. वाळूच्या विक्रीवरूनही त्यांनी मंदिर प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला होता. यामुळे पक्षातील नेत्यांनीच त्यांना विरोध केला होता.

२. राजू यांनी असाही दावा केला होता की, आंध्रप्रदेशामध्ये २.५ टक्के इतकीच ख्रिस्त्यांची लोकसंख्या अधिकृतरित्या सांगितली जात असली, तरी प्रत्यक्षात ती २५ टक्के इतकी आहे.

३. ख्रिस्त्यांच्या विरोधात आवाज उठवत असल्याने राजू यांच्याच पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून त्यांना ठार मारण्याची शक्यता असल्याचा आरोप करत राजू यांनी पोलीस संरक्षण देण्याचीही मागणी केली होती.