हरिद्वारे कुंभमेळ्यामुळे देशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा दावा खोटा ! – दैनिक ‘जागरण’कडून सप्रमाण सिद्ध !

अशी शोधपत्रकारिता करण्याचा प्रयत्न देशातील राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी का कला नाही ? कि ‘हिंदु धर्म आणि त्यांच्या धार्मिक उत्सवांना लक्ष्य करण्यातच ते नेहमी धन्यता मानतात ?’ असे हिंदूंनी समजायचे ?

हरिद्वार (उत्तराखंड) – एप्रिल मासामध्ये हरिद्वारमध्ये झालेल्या कुंभमेळ्यामुळे देशात कोरोनाचा संसर्ग वाढला, असा दावा विविध राजकीय पक्ष, संघटना, पुरोगामी, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आदींकडून केला जात आहे; मात्र दैनिक ‘जागरण’ने केलेल्या शोधपत्रकारितेतून हा दावा निखालस खोटा असल्याचे समप्रमाण सिद्ध करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

१. कुंभमेळ्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे म्हणणार्‍यांचा दावा आहे की, ११ मार्च या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त सर्वाधिक म्हणजे ३२ लाख ३७ सहस्र भाविक हरिद्वार येथे आले होते. त्याच्या २० दिवसांनंतर उत्तराखंडमध्ये केवळ २९३ जणांना कोरोना झाल्याचे समोर आले. त्यातही प्रत्यक्ष हरिद्वारमध्ये केवळ ७० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्याच वेळी कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण सरकारी आकडेवारीनुसार ९६.९४ टक्के इतके होते. (या आकडेवारीरून कुंभमेळ्यावर कोरोना पसरवण्याचा आरोप करणारे तोंड उघडतील का ? – संपादक)

२. कुंभमेळ्यातील ३ पवित्र स्नानांमध्ये एकूण ६५ ते ७० लाख लोकांनी सहभाग घेतल्याचा दावा उत्तराखंड सरकारकडून करण्यात आला होता. यामुळे कोरोनावरून कुंभमेळ्यावर टीका करणार्‍याना आयतेच कोलीत मिळाले; मात्र दैनिक ‘जागरण’ने केलेल्या पडताळणीमध्ये तिन्ही पवित्र स्नानाला केवळ ११ लाख भाविकच हरिद्वारमध्ये आले होतेे. त्यामुळे सरकारचा दावा खोटा असल्याचे लक्षात येते. महाशिवरात्रीच्या स्नानाला बस आणि रेल्वे यांद्वारे ३३ सहस्र २००, तर तिन्ही स्नानांसाठी या माध्यमांतून ९२ सहस्र ७०० जण आले. खासगी वाहनांद्वारे ५ लाख भाविक आले. तसेच साधू संत यांची संख्या ५ लाखाच्या जवळपास होती.

३. विविध सरकारी कार्यालयांच्या अंदाजानुसार हरिद्वारमध्ये ५ लाख ३० सहस्र लोक बाहेरून येऊन थांबू शकतात. हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष आशुतोष शर्मा यांच्या म्हणण्यानुसार कुंभच्या काळात येथील हॉटेल, लॉज आदींमध्ये केवळ २० ते ३० टक्केच आरक्षण झाले होते.

४. कुंभमध्ये १५ सहस्र पोलिसांना तैनात करण्यात आले होते, त्यांतील केवळ १४५ जणांनाच कोरोनाची बाधा झाली.

५. उद्योग व्यापार मंडळाचे हरिद्वारचे जिल्हा महामंत्री संजीव नैय्यर यांनी सांगितले की, कुंभच्या काळात येथील बाजारामध्ये शांतताच होती. ‘कुंभमुळे व्यापार होईल’, असे वाटत होते. ही आशा धुळीस मिळाली. उलट कोरोनाचा प्रसार केल्याची अपकीर्तीच होत आहे.

ज्या राज्यांत कोरोनाचा संसर्ग वाढला त्या राज्यातील नगण्य भाविक कुंभमध्ये सहभागी झाले होते ! – महंत नरेंद्र गिरि, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद

महंत नरेंद्र गिरि, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांनी सांगितले की, कुंभमेळ्यामुळे ज्या राज्यांत कोरोनाचा संसर्ग वाढला, असे सांगण्यात येत आहे, प्रत्यक्षात त्या राज्यांतून कुंभमेळ्यासाठी आलेल्या भाविकांची संख्या अत्यंत नगण्य होती. रेल्वे आणि बस यांच्या आरक्षणातून हे स्पष्ट होते. कुंभमुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याचा दावा करणे हे सनातन धर्म, कुंभ आणि त्याची व्यवस्था करणारे सरकार यांची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र आहे.