पुणे येथे कोरोनाबाधित महिलेची कॅनॉलमध्ये उडी टाकून आत्महत्या

साधनेमुळे मनाला स्थिरता येते. कोरोना महामारीच्या काळामध्ये मानसिक स्वास्थ्य चांगले रहाण्यासाठी साधनाच आवश्यक आहे !

पुणे – गंज पेठ परिसरात रहाणार्‍या ६० वर्षीय महिलेला ३ मे या दिवशी कोरोनाचा संसर्ग झाला. तिच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते; पण ‘माझ्यामुळे कुटुंबियांनाही कोरोनाचा संसर्ग होईल’, या मानसिक तणावामध्ये असल्याने ती महिला रुग्णालयातून पळून गेली. त्यानंतर हडपसर परिसरातून वहाणार्‍या कॅनॉलमध्ये या महिलेचा मृतदेह आढळला.