भाजपचे ओंकार शुक्ल यांच्याकडून पोलीस, महापालिका कर्मचारी यांना ७ दिवस लिंबूयुक्त चहाचे वाटप

पोलिसांना लिंबूयुक्त चहाचे वाटप करतांना ओंकार शुक्ल (उजवीकडे)

सांगली, १२ मे (वार्ता.) – भाजपचे सांस्कृतिक आघाडीप्रमुख श्री. ओंकार शुक्ल, तसेच त्यांचे सहकारी श्री. संतोष कुलकर्णी आणि श्री. राजन काकीर्डे यांनी गेले ७ दिवस १०० पोलीस, महापालिका कर्मचारी, लसीकरण केंद्रातील कर्मचारी, पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांना विनामूल्य लिंबूयुक्त चहाचे वाटप केले. याचा सर्व व्यय श्री. ओंकार शुक्ल यांनी स्वत: केला. सामाजिक जाणीवेतून श्री. ओंकार शुक्ल हे सातत्याने कार्यरत असतात.