तिलारी धरण क्षेत्रातील अवैध वृक्षतोड थांबवण्याची ग्रामस्थांची मागणी

तिलारी धरण क्षेत्र

दोडामार्ग – तिलारी धरण क्षेत्रातील आयनोडे येथे सामायिक क्षेत्र (सर्वे क्रमांक ५१)मध्ये बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. या क्षेत्राशी कोणताही संबंध किंवा अधिकार नसलेल्या व्यक्तींनी या क्षेत्रात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ही वृक्षतोड थांबवून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी संबंधित खातेदारांनी तहसीलदार अरुण खानोलकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मूळ आयनोडे गावातील तिलारी धरणाच्या उजव्या बाजूला बोर्येवाडी येथील सामायिक क्षेत्राशी संबंध नसलेल्या काही व्यक्ती अद्याप तेथे वृक्षतोड करत आहेत. कोरोनाच्या काळात कोणाचेही लक्ष नसल्याचा लाभ उठवत ही वृक्षतोड केली जात आहे. ३ मे या दिवशी या क्षेत्राशी निगडित ग्रामस्थांनी येथे वृक्षतोड होत असल्याचे पाहिले. तसेच तेथील काही शासकीय भूमीतील झाडेही तोडली जात आहेत, असा संबंधितांचा आरोप आहे.