महाराष्ट्र कोरोनाच्या विरोधातील लढाई चांगली लढत आहे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या विरोधात महाराष्ट्र चांगली लढाई लढत  आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी ८ मे या दिवशी कोरोनाच्या स्थितीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेल्या काही सूचना मान्य केल्या आहेत, याविषयी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.