सांगली येथे पोलीस आयुक्तालय व्हावे ! – युवा सेनेच्या वतीने निवेदन


सांगली – सांगली येथे पोलीस आयुक्तालय व्हावे, प्रलंबित असलेले १०० फुटी रस्त्यावरील आणि विजयनगर येथे नवीन स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे, रिसाला रस्त्यावरील जुने वाहतूक शाखा कार्यालय पुन्हा चालू करावे, अशा मागण्यांचे निवेदन युवा सेना सांगली शहर सरचिटणीस राहुल यमगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही पाठवण्यात आले आहे. जुन्या ठिकाणीच स्वतंत्र वाहतूक पोलीस ठाणे आणि स्वतंत्र अधिकारी नेमून वाहतूक शाखा पुन्हा चालू करावी, अशीही मागणी त्यात करण्यात आली आहे. या वेळी ऋषिकेश बेडकर, प्रतिक वाघमोडे, संदीप कांबळे, अभिषेक शिंदे आदी युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.