ससून रुग्णालयातून (पुणे) रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी

कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असतांना असे प्रकार होणे, ही स्वार्थांधतेची परिसीमा होय ! यावरून समाजाचे नैतिक अध:पतन झाल्याचेच लक्षात येते !

पुणे – ससून रुग्णालयाच्या कोविड इमारतीमधून रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ससून रुग्णालयातील परिचारिकेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली असून ही घटना १ ते ३ मे या कालावधीत घडली. ज्या ठिकाणी इंजेक्शन ठेवले होते, तिथे ते न मिळता इंजेक्शनचे रिकामे ‘व्हायल’ सापडले. साहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश ठाकूर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.