वणी (यवतमाळ) येथे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू यांचे प्रमाण सर्वाधिक !

वणी (यवतमाळ), ७ मे (वार्ता.) – तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. केवळ ३०९ लोकसंख्येच्या टाकळी गावात ७१ रुग्ण आढळून आले. रुग्णांवर उपचार करणारे आधुनिक वैद्य रुग्णांना कोरोना चाचणी करण्यास न सांगता केवळ उपचार करत रहातात. त्यामुळे संसर्ग वाढून मृत्यू ओढावतो. (ग्रामीण भागातील आधुनिक वैद्यांवर अंकुश कोण बसवणार ? – संपादक)