मीरा रोड येथील श्री परमहंस रुग्णालयाची कोविड मान्यता रहित !

ठाणे, ७ मे (वार्ता.) – मीरा रोड येथील इंद्रलोक फेज – ६ भागात असलेल्या श्री परमहंस रुग्णालयाची कोविड उपचारांसाठी दिलेली मान्यता आयुक्त दिलीप ढोले यांनी रहित केली आहे. ३ कोविड रुग्णांच्या मृत्यूविषयी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याविषयी नोटीस बजावूनही रुग्णालय प्रशासनाने त्याचे स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. रुग्णालयास कोरोना रुग्णांवर उपचारासाठी महानगरपालिकेने अनुमती दिली होती; परंतु रुग्णालयातील कोरोनाच्या रुग्णांची मृत्यूची संख्या, रुग्णांवरील उपचारातील त्रुटी आणि गैरव्यवस्थापन आदी तक्रारी येत होत्या.