रक्तदानाचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन टिम डेली न्यूज पेपर्सच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन !


सोलापूर – कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाल्यावर ३ मास रक्तदान करू शकत नाही, त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळे संभाव्य रक्तदानाचा तुटवडा लक्षात घेऊन शास्त्रीनगर येथे टिम डेली न्यूज पेपर्सच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १०१ जणांनी रक्तदान केले. (रक्तदानाचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करणार्‍या टिम डेली न्यूज पेपर्सचे अभिनंदन ! – संपादक) या वेळी रक्तदान करणार्‍यांना अन्नपदार्थांचे एक विशेष किट देण्यात येत होते. यातील २१ जणांनी हे किट नाकारून ते गरिबांना देऊन एक आदर्श निर्माण केला.