मुंबई येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तस्पर्शाने चैतन्यमय झालेल्या गुरुपादुकांचे आगमन होण्यापूर्वी आणि आगमन झाल्यानंतर साधकांना आलेल्या अनुभूती
१. गुरुपादुकांचे आगमन होण्यापूर्वी
१ अ. निर्विचार स्थिती अनुभवून नामजप एकाग्रतेने हो
णे : ‘मुंबई सेवाकेंद्रात गुरुपादुकांच्या पूजनाचा सोहळा आहे’, हे समजल्यापासूनच ‘मला पुष्कळ चैतन्य मिळत असून माझ्या आनंदात वाढ झाली आहे’, असे मला जाणवले. माझे मन पुष्कळ उत्साही होऊन मी निर्विचार स्थिती अनुभवत होते. एरव्ही नामजप करतांना माझ्या मनात पुष्कळ विचार येतात; पण आता माझा नामजप एकाग्रतेने होत होता.’ – सौ. आशा गंगाधरे, मुलुंड
१ आ. पहाटे झोपेत असतांना गुरुमाऊलीवर पुष्पवृष्टी होतांना दिसणे : ‘श्री गुरुपादुका आणायच्या आदल्या रात्री झोपल्यावर मला ‘चारचाकी गाडीत गुरुमाऊली स्थानापन्न झालेली असून मार्गाच्या दोन्ही बाजूंना साधक आणि भाविक अन् आकाशातून देवता आणि ऋषिमुनी गुरुमाऊलीवर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे दिसले. नंतर मला जाग आली. तेव्हा घड्याळात पहाटेचे ३ वाजले होते.’ – श्री. प्रकाश सागवेकर, मुंबई
२. गुरुपादुकांचे आगमन झाल्यानंतर
२ अ. गुरुपादुकांचे दर्शन घेतांना ओटीपोटात दुखणे : ‘गुरुपादुकांचे आगमन झाल्यावर ‘मी रामनाथी आश्रमात असून परात्पर गुरु डॉक्टरांचा भावसत्संग चालू आहे’, असे मी अनुभवत होते. नंतर श्री गुरुपादुकांचे ३ फूट अंतरावरून दर्शन घेत असतांना माझ्या ओटीपोटात दुखायला लागून ओटीपोटात कळा येऊ लागल्या. एक घंट्यानंतर माझ्या ओटीपोटात दुखायचे न्यून झाले.’ – सौ. आशा गंगाधरे
२ आ. गुरुपादुकांचे पूजन चालू असतांना पाठीत दुखणे, तरीही सतत नामजप होऊन आनंद जाणवणे : ‘मला परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवून माझा भाव जागृत झाला. गुरुपूजन चालू असतांना माझ्या पाठीत कळ येत होती. त्यामुळे मला बराच वेळ बसता येत नव्हते. मला परात्पर गुरु डॉक्टरांची सतत आठवण येत होती. माझे सतत नामस्मरण होत होते आणि मला आनंद जाणवत होता.’ – श्री. मुकुंद घाणेकर, जागमाता, ठाणे.
२ इ. ‘गुरुपादुकांच्या माध्यमातून प्रतिदिन गुरुपौर्णिमा अनुभवता येईल’, असे वाटणे : ‘गुरुपादुकांच्या ठिकाणी प्रत्यक्ष गुरुदेव आहेत आणि ते सर्व साधकांना चैतन्य अन् साधना करण्यासाठी शक्ती देत असल्याचे जाणवले. ‘या दैवी सोहळ्याला देवता उपस्थित असून सूक्ष्मातून गुरुचरणांवर पुष्पवृष्टी करत आहेत. आज गुरुपौर्णिमेचा महोत्सव असून गुरुपादुकांच्या माध्यमातून साधकांसाठी प्रतिदिन गुरुपौर्णिमा असणार आहे’, असे मला जाणवले.’ – श्री. बळवंत पाठक, मुंबई सेवाकेंद्र
२ ई. ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर दिव्य पादुकांचे पूजन करत असतांना मला संपूर्ण खोलीभर प.पू. गुरुमाऊलींचे रूप दिसले. पूजन चालू असतांना सद्गुरु अनुताई निरांजनाने ओवाळत असतांना मला दिव्य प्रकाश जाणवला.’ – कै. माधव साठे, कल्याण
२ उ. ‘श्री गुरुपादुकांचे दर्शन घेतल्यावर माझे मन निर्विचार झाले आणि ‘पादुकातून गोलाकार चक्रे निघून माझ्या शरिरात जात आहेत’, असे मला जाणवले.’ – श्री. सतीश बांगर, मुंबई सेवाकेंद्र
२ ऊ. ‘मी थोडा वेळ नामजप केला. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या पादुका माझ्या संपूर्ण शरिरात फिरत आहेत’, असे मला जाणवले. त्यानंतर मला हलकेपणा जाणवला.’ – श्री. विलास गुरव, परळ
२ ए. श्री गुरुपादुकांना नमस्कार करतांना दोन्ही हात आणि डोके भूमीला चिकटून बसल्याचे अन् आज्ञाचक्रातून शरिरात पुष्कळ चैतन्य जात असल्याचे जाणवणे : ‘सद्गुरु अनुताई पूजा करत असतांना त्यांच्या ठिकाणी मला मोगर्याची फुले दिसली. पू. (सौ.) संगीता जाधवकाकू बोलत असतांना त्यांच्या ठिकाणीही मला मोगर्याची फुले दिसली. ‘दोन देवी या सोहळ्यास उपस्थित आहेत’, असे मला वाटले. पादुकांना नमस्कार करत असतांना माझे दोन्ही हात आणि डोके भूमीला चुंबकाप्रमाणे चिकटून बसले असून आज्ञाचक्रातून शरिरात पुष्कळ चैतन्य जात आहे’, असे मला जाणवले. तेव्हा माझे मन पूर्ण निर्विचार झाले.’ – श्री. सुनील लोंढे, ऐरोली, मुंबई.
२ ऐ. ‘श्री गुरुपादुकांचे दर्शन घेतांना माझ्या आज्ञाचक्रात काहीतरी जात आहे’, असे मला जाणवले. माझ्या डोळ्यांत भावाश्रू येऊन माझा देह गदगदून आला.’ – श्री. प्रकाश सागवेकर, मुंबई
२ ओ. गुरुपादुका पूजनाच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांंचे अस्तित्व जाणवणे : ‘गुरुपादुकांचे पूजन चालू असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्यक्ष समोर बसले असून सद्गुरु अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू त्यांची पूजा करत आहेत अन् परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांना आशीर्वाद देत आहेत’, असे मला दिसले. ‘गुरुपादुकांतून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला दिसले. ‘मला सेवाकेंद्रात श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवून त्याचे सुदर्शनचक्र सर्वत्र फिरत आहे’, असेही जाणवले.’ – सौ. विद्यागौरी गुजर, मुंबई
२ औ. गुरुपादुकांचे आगमन होतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच येत आहेत’, असे वाटणे, गुरुपादुकांमधून बाहेर पडणार्या चैतन्यामुळे मुंबई सेवाकेंद्र चैतन्यमय होऊन प्रति रामनाथी आश्रम झाल्याचे जाणवणे : ‘सकाळपासून माझा नामजप आणि प्रार्थना आपोआप होत होत्या. गुरुदेवांच्या पादुकांचे आगमन होताच ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्यक्षात येत असून त्यांच्या समवेत देवता आहेत’, असे मला दिसले. पादुकांचे आगमन झाल्यावर सगळीकडे पुष्कळ चैतन्य पसरल्याचे मला जाणवले. मला सगळीकडे लख्ख प्रकाश दिसत होता. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून अश्रूधारा वहात होत्या. ‘परात्पर गुरुदेवांच्या चरणांचे सद्गुरु अनुताई पूजन करत आहेत’, असे मला जाणवत होते. ‘मुंबई सेवाकेंद्र प्रति रामनाथी आश्रम आहे’, असे मला वाटत होते. ‘गुरुदेवांच्या पादुकांतून चैतन्याचा स्रोत बाहेर पडत आहे’, असे जाणवून ‘आज आश्रमातून घरी जाऊच नये’, असे मला वाटत होते. ‘विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हे सर्व अनुभवायला दिले’, त्याविषयी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. नमिता दुखंडे, मुंबई (२९.४.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |