कोल्हापूर, २७ एप्रिल (वार्ता.) – चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जोतिबा डोंगर येथे जोतिबा देवाची बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. सकाळी ५ ते ६ या वेळेत महाअभिषेक होऊन, सकाळी १० ते १२ धुपारतीसह पंचारती करण्यात आली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डोंगराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून काही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत महापूजा, सासनकाठी मिरवणूक, तसेच अन्य विधी करण्यात आले.
सलग दुसर्या वर्षी मोठ्या प्रमाणात होत असलेली यात्रा रहित झाल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थान समितीच्या वतीने यात्रेच्या निमित्ताने होणारे धार्मिक विधी आणि पालखी सोहळ्याचे फेसबूकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्यात आले होते.