आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना !
नवी देहली – येथील रोहिणी परिसरात असणार्या जयपूर गोल्डन रुग्णालयात २३ एप्रिलला सायंकाळी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी आक्रोश केला. याविषयी स्पष्टीकरण देतांना रुग्णालय प्रशासनाने म्हटले की, रुग्णांना ३ सहस्र ६०० लीटर ऑक्सिजनची आवश्यकता होती; पण रात्री १२ वाजेपर्यंत केवळ १ सहस्र ५०० लीटर ऑक्सिजनची पूर्तता करण्यात आली. त्यामुळे २० रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील ‘मेडिकल सुप्रिटेंडेंट’ यांनी सांगितले की, या रुग्णालयात अद्याप २०० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्यासाठी अद्याप ऑक्सिजन उपलब्ध झालेला नाही.