गुजरातमध्ये सामूहिक नमाजपठण रोखण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांचे आक्रमण !

  • पोलीस चौकी आणि पोलीस ठाणे यांवर आक्रमण

  • दुचाकी, चारचाकी जाळल्या

  • एक पोलीस घायाळ

  • भाजपशासित राज्यांत अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! पोलिसांचा धर्मांधांवर वचक असला पाहिजे !
  • कोरोनाच्या काळात अशा प्रकारचे आक्रमण करणार्‍यांना दुप्पट शिक्षा केली पाहिजे !
धर्मांधांच्या जमावाने केलेले पोलीस ठाण्यावरील आक्रमण (सौजन्य: divyabhaskar.co.in)

कर्णावती (गुजरात) – कोरोनाकाळात घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने राज्यातील कपडवंजमधील लायन्स क्लबजवळील अली मशीद येथे सामूहिक नमाजपठण रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्माधांनी आक्रमण केले. त्यानंतर धर्मांधांच्या जमावाने येथील कुंडव पोलीस चौकी आणि टाऊन पोलीस ठाणे यांवरही आक्रमण केले.

येथील १ चारचाकी गाडी आणि दोन दुचाकी जाळल्या. या वेळी पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या; मात्र परिस्थितीत काहीच पालट न झाल्याने अतिरिक्त पोलीस बळ मागवून स्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या हिंसाचारात एक पोलीस घायाळ झाला. या घटनेविषयी पोलिसांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही माहिती दिली नाही. गेल्या वर्षीही देशात विविध ठिकाणी कोरोनाच्या काळात अशाच प्रकारे धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमणे केली होती.