गोविंदा, कसा लागला तुझा छंद ।
तुझे नाम सतत मुखी येऊ दे ॥ १ ॥
आता काही नाही मागणे रे माधवा ।
उरलेले आयुष्य तुझ्या चिंतनात जाऊ दे ॥ २ ॥
आता आयुष्य समाधीकडे ।
लागले डोळे ।
तुझ्या बासरीचे स्वर ऐकता ।
आनंदाने डोळे मिटू दे ॥ ३ ॥
माता-पित्याचे छत्र हरपले
बंधू-भगिनी दूर जाहले ।
सगे-सोयरे मला विसरले ।
शेवटी कुणीच नसते, कोण कुणाचे ॥ ४ ॥
तुझे नाम घेता ।
आनंदाने डोळे मिटू दे ।
हेच मागणे देवा तुझ्याकडे ॥ ५ ॥
– श्री. सुधाकर के. जोशी (वय ९१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.९.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |