त्वरेने ये हे भावसत्संगा ।

हे भावमय भावसत्संगा ।
हे गुरुदेवांचे चैतन्य देणार्‍या महास्रोता ।
त्वरेने ये हे भावसत्संगा ॥ १ ॥

सन्मुख होऊन वाट पहात आहोत ।
आम्ही तुझ्या येण्याची ।
तू आणतोस अमूल्य क्षण ।
त्वरेने ये हे भावसत्संगा ॥ २ ॥

गुरुचरणी एकरूप होण्याची तळमळ ।
भावगंगेत चिंब होण्याची आस ।
भक्तीमय होणारे ध्यान ।
त्वरेने ये हे भावसत्संगा ॥ ३ ॥

आमचे आवरण काढून ।
हे गुरुचरणी घेऊन जाणार्‍या मार्गा ।
संत, सद्गुरूंच्या वाणीतून चैतन्य देणार्‍या तू ।
त्वरेने ये हे भावसत्संगा ॥ ४ ॥

धन्य धन्य हे जीव ।
तुझ्या सहवासाने पावन झाला हा जन्म ।
क्षणोक्षणी तुझीच जाणीव ।
त्वरेने ये हे भावसत्संगा ॥ ५ ॥

– सौ. शारदा योगीश, बेंगळुरू. (२४.१२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक