कोरोनाचा वाढता संसर्ग आणि पालिका निवडणूक आचारसंहिता यांमुळे विधानसभा अधिवेशन १९ जुलैपर्यंत स्थगित

पणजी, ३० मार्च (वार्ता.) – राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग, तसेच ५ नगरपालिकांच्या निवडणुकीमुळे निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने शासनाने विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १९ जुलैपर्यंत स्थगित केले आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या दुपारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी ५ मासांच्या लेखानुदानाला विधानसभेत संमती देण्यात आली.

वास्तविक प्रारंभी विरोधी पक्षांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी घटवण्याची मागणी केली होती; मात्र शासनाने ही मागणी फेटाळून लावली होती. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २४ मार्च या दिवशी प्रारंभ झाला आणि ते १६ एप्रिलपर्यंत चालणार होते.