सांगली – मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून मिरज-शेणोली दरम्यान घेण्यात आलेल्या विद्युत् चाचणीत रेल्वे ताशी १५० किलोमीटर वेगाने धावली. सध्या मिरज ते पुणे या मार्गावर विद्युतीकरण करण्यात येत आहे. मिरज-पुणे रेल्वे मार्गावर बहुतांश ठिकाणी हे काम पूर्ण होत आले आहे. दोन मासांपूर्वीही याचप्रकारे चाचणी घेण्यात आली होती.