एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. सिल्विया विझकारा यांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची त्यांची मुलगी चि. गियाना हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या बोलिव्हिया येथील साधिका सौ. सिल्विया विझकारा यांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची त्यांची मुलगी चि. गियाना (वय १० मास) हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

२२ मार्च या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.च्या बोलिव्हिया येथील साधिका सौ. सिल्विया विझकारा यांना गरोदरपणी झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती पहिल्या. आज या लेखाच्या अंतिम भागात त्यांची मुलगी चि. गियाना हिची गुणवैशिष्ट्ये पाहूया.

या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  https://sanatanprabhat.org/marathi/461330.html

चि. गियाना

२. बाळाच्या जन्मानंतर

भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेने अन् त्यांच्या नियोजनानुसार गुढीपाडव्याच्या (२४.३.२०२० या दिवशी) शुभ दिनी बाळाचा जन्म झाला. आता माझ्या गरोदरपणाविषयी विचार करतांना मला त्यातील अडथळे आणि त्रास आठवत नाहीत; तर ‘त्या काळात देवाने मला किती आनंदी ठेवले होते’, हे आठवते. भोवतालची परिस्थिती कठीण असूनही श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेने मला गरोदरपणात सकारात्मक रहाता आले. यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

२ अ. जन्म ते ३ मास   

२ अ १. बाळाची शारीरिक वाढ चांगली असणे : बाळाला रुग्णालयातून घरी आणल्यावर मला आणि माझ्या यजमानांना जाणवले की, बाळ ‘सभोवती काय चालले आहे ?’, याविषयी सजग आहे. अवघ्या काही दिवसांच्या बाळाच्या शारीरिक हालचाली चांगल्या होत्या. गियाना (बाळ) स्वतःची बोटे आणि तळवे सहजपणे हलवत होती. तिला अंगावर दूध पाजल्यावर मला आध्यात्मिक लाभ होत असल्याचे जाणवते.

२ अ २. नामजप, मंत्रजप आदी ऐकण्याची आवड : बाळ जेव्हा किरकिर करत असे, तेव्हा आम्ही नामजप, मंत्रजप, स्तोत्र किंवा श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे पाळणे लावत असू. ते ऐकून ती शांत होत असे.

सौ. सिल्विया विझकारा

२ अ ३. बाळाला घेऊन परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर उभे राहिल्यावर बाळाला आध्यात्मिक लाभ होणे : बाळ १ मासाचे असतांना एकदा मी तिला दूध पाजल्यावर पोटात वायू धरल्यामुळे तिला ढेकर आली नाही. नंतर बाळाला घेऊन मी परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर उभी राहिले आणि तिने लगेच ढेकर दिली. बाळाने काही क्षण गुरुदेवांकडे पाहिले अन् तिला आध्यात्मिक लाभ झाल्याचे जाणवले.

२ अ ४. गियानाला मांडीवर घेऊन नामजप करतांना ती नामजपातील स्पंदने ग्रहण करत असल्याचे जाणवणे : एकदा मी दीड मासाच्या गियानाला मांडीवर घेऊन परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रासमोर नामजप करत बसले होते. त्या वेळी ती झोपली. झोपेतही तिचा तोंडवळा स्थिर होता आणि ‘ती नामजपातील सकारात्मक स्पंदने ग्रहण करत आहे’, असे मला जाणवले. नंतरही असे बर्‍याचदा घडले.

२ अ ५. ला पाझ येथील सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात गुरुपादुकांची पूजा चालू झाल्यावर गियानाने ती एकटक आणि शांतपणे पहाणे अन् गुरुपादुकांकडे एकाग्रतेने पहाणार्‍या गियानाला पाहून भाव जागृत होणे : गियाना अडीच मासांची असतांना मी तिला घेऊन प्रथमच ला पाझ येथील सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात गेले होते. तेथे गुरुपादुकांची पूजा चालू झाल्यावर ती रडू लागली. मी तिला कडेवर घेतले असल्याने तिचा तोंडवळा माझ्या दिशेने होता आणि तिला पूजा दिसत नव्हती. मी तिचा तोंडवळा पूजेच्या दिशेने केल्यावर तिचे रडणे थांबले. ती गुरुपादुकांकडे पुष्कळ कुतूहलाने पहात होती. तेथे असलेले श्रीकृष्णाचे चित्र, परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र, तसेच तेथील मोरपीस यांकडे ती टक लावून पहात होती. गियानाला गुरुपादुकांकडे एकाग्रतेने पहातांना पाहून माझा भाव जागृत झाला. यानंतर माझ्या साधनेच्या प्रयत्नांत सातत्य आणि गांभीर्य आले. माझी ईश्‍वरप्राप्तीची तळमळ आणि अनुसंधानही वाढले. माझ्या मनात ‘गियानावर चांगले संस्कार करायचे आहेत’, हा एकच विचार सातत्याने येत होता.

२ आ. तीन ते सहा मास

२ आ १. तीन मास 

अ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी असलेला ‘ऑनलाईन’ सत्संग गियानाने माझ्या मांडीवर बसून शांतपणे ऐकला. या १ घंट्याच्या कालावधीत ती साधकांना सतत नमस्कार करत होती.

आ. गियाना ३ मासांची झाल्यावर मी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या मार्गदर्शनानुसार तिची दृष्ट काढायला आरंभ केला. तिच्या आजी (श्रीमती सिल्विया दत्तोली) यांनी प्रथम फुलाने तिची दृष्ट काढली. दृष्ट काढतांना ती आजीकडे शांतपणे पहात होती. एकदा बाळाची दृष्ट काढून झाल्यावर मला आणि तिच्या आजीला तीव्र दुर्गंध आला. त्यानंतर मी सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या मार्गदर्शनानुसार प्रतिदिन ‘श्री हनुमान बाळाची मानस दृष्ट काढत आहेत’, असा भाव ठेवून दृष्ट काढायला आरंभ केला. नियमित दृष्ट काढू लागल्यावर गियाना शांत झाली अन् तिचे रडणेही उणावले.

२ आ २. चौथा मास – गियानामधील ईश्‍वरी तत्त्वाला कृतज्ञता व्यक्त केल्यावर गियानाने स्मितहास्य करणे : गियाना ४ मासांची असतांना एकदा मी शांतपणे तिच्यातील ईश्‍वरी तत्त्वाशी आलंबन करत होते. त्या वेळी मी ‘माझ्या जीवनात झालेले गियानाचे आगमन आणि तिच्याकडून शिकण्याची संधी दिली’, यांसाठी ईश्‍वरी तत्त्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हे आलंबन संपल्यानंतर गियानाने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले.

२ आ ३. पाचवा मास – ‘ज्योत से ज्योत जगावो ।’ ही आरती ऐकतांना गियानाला आनंद होणे : एकदा मी गियानाला घेऊन आरती म्हणत होते. नंतर ‘ज्योत से ज्योत जगावो ।’ ही आरती म्हणण्यासाठी मी डोळे बंद केले. त्या वेळी गियानाने तोंडाने आवाज केला; म्हणून मी डोळे उघडले, तेव्हा गियाना माझ्याकडे पाहून हसत होती. तिच्या हसण्यामुळे ‘ही आरती ऐकून तिला आनंद झाला आहे’, असे माझ्या लक्षात आले.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाला नमस्कार करतांना चि. गियाना

२ आ ४. सहावा मास – परात्पर गुरुदेवांचा ग्रंथ पाहून उत्साहाने हात-पाय हलवणारी आणि गुरुदेवांच्या छायाचित्राकडे एकटक पाहून हसणारी गियाना ! : एके दिवशी गियानाची आजी आणि काका श्री. हायमे तिला एस्.एस्.आर्.एफ्.ने प्रकाशित केलेले साधनेविषयीचे ग्रंथ आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हे ग्रंथ दाखवत होते. परात्पर गुरुदेवांचा ग्रंथ पाहून गियाना उत्साहाने हात-पाय हलवत होती. तिने दोन्ही हातांनी ग्रंथ पकडला आणि ती गुरुदेवांच्या छायाचित्राकडे एकटक पाहून हसू लागली. त्यांना पाहून तिने ‘पा पा’ असे म्हटले. ‘पा. .पा’ हा उच्चार ती नुकताच शिकली होती. स्पॅनिशमध्ये ‘पापा’चा अर्थ ‘वडील’ असा होतो. या प्रसंगात आमचा सर्वांचा भाव जागृत झाला. पुन्हा एकदा छायाचित्रमय जीवनदर्शन हा ग्रंथ दाखवल्यावर तिने वरीलप्रमाणेच कृती केली; मात्र या वेळी तिने ‘आदरपूर्वक नमस्कार करत आहे’, या भावाने त्यांच्या छायाचित्रासमोर हळूवारपणे मस्तक झुकवले.

२ आ ५. गियानाच्या शरिरावर आणि डोक्यावर दैवी कण सापडणे : बाळ जन्माला आल्यापासून ते ६ मास या कालावधीत अनेक वेळा मला बाळाच्या शरिरावर आणि डोक्यावर दैवी कण सापडत होते. पुष्कळदा ‘बाळाच्या कपड्यांवर असलेल्या सोनेरी आणि चंदेरी चमकीमुळे हे कण पडतात’, असे मला वाटायचे. काही वेळा आम्हाला बाळाच्या अंगावर मोरपंखी, लाल आणि गुलाबी रंगांचे दैवी कणही सापडत; मात्र या रंगांची चमकी असलेले कपडे बाळाला आणलेले नव्हते.

२ आ ६. अनुभूती – गेली २ वर्षे आमच्या बागेतील काही फुलझाडांना फुले येत नव्हती. गियानाचा जन्म झाल्यावर त्यांना फुले येऊ लागली.  

२ आ ७. ऐकण्याची वृत्ती असलेली चिमुकली गियाना ! : पहिल्यापासून मी गियानाला सांगत असे, ‘अंथरूण आवरून प्रार्थना करेपर्यंत तू वाट पहा. रडू नकोस.’ ती न रडता माझे बोलणे ऐकत असे आणि माझी प्रार्थना झाल्यावर मात्र ‘तिला घ्यावे’; म्हणून रडायला चालू करत असे.

३. स्वभावदोष : संयम नसणे – काही वेळा गियानाचे एखादे खेळणे खेळतांना खाली पडते. तिला ते घेता आले नाही, तर ती लगेच रडायला चालू करते.

४. कृतज्ञता

हे ईश्‍वरा आणि परात्पर गुरु डॉक्टर, आपल्याच असीम कृपेने आमच्या या साधक कुटुंबात एका बालसाधिकेचे आगमन झाले आहे. तिच्या सहवासामुळे आम्हाला पुष्कळ आनंद मिळतो आणि तिच्याकडून शिकायची संधीही मिळते. यासाठी आम्ही सर्वजण आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत. मला ‘ईश्‍वराची सेवा’ म्हणून बाळाचे पालनपोषण करायचे आहे. ‘आध्यात्मिक दृष्टीने ‘आदर्श आई’ होण्यासाठी मी कोणते प्रयत्न करू?’, याविषयी आपणच मला मार्गदर्शन करा’, अशी आपल्या चरणी प्रार्थना करते.’

आपली,

– सौ. सिल्विया विझकारा, ला पाझ, बोलिव्हिया. (डिसेंबर २०२०)

(समाप्त)

परात्पर गुरु डॉक्टरांनी चि. गियानाला भेट म्हणून दिलेले ‘ब्लँकेट’ पाहून तिच्या आई-बाबांची भावजागृती होणे

‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला चि. गियानाला काहीतरी भेट देण्याचा निरोप दिला होता. त्यानुसार आम्ही तिला परात्पर गुरु डॉक्टर आणि एस्.एस्.आर्.एफ्. यांच्या वतीने भेट म्हणून एक ‘ब्लँकेट’ दिले. ही भेट पाहून तिचे आई-बाबा सौ. सिल्विया आणि श्री. मॉरिसिओ यांची भावजागृती झाली.’

– एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक

बोलिव्हिया येथील ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे साधक-दांपत्य सौ. सिल्व्हिया आणि श्री. मॉरिसिओ यांची कन्या चि. गियाना (वय १० मास) हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित !

१. प्रेमभाव आणि आनंदी वृत्ती असलेल्या चि. गियानाची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर तिच्या आई-वडिलांनी भावस्थिती अनुभवणे

‘२.२.२०२१ या दिवशी झालेल्या एका ‘ऑनलाईन’ सत्संगात ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे बोलिव्हिया येथील साधक-दांपत्य सौ. सिल्व्हिया आणि श्री. मॉरिसिओ यांची कन्या चि. गियाना (वय १० मास) हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. गियानामध्ये परेच्छेने वागणे, प्रेमभाव, आनंदी रहाणे, हे गुण आहेत, तसेच ती ईश्‍वराच्या अनुसंधानात असल्याचे अनुभवता येते. पातळी घोषित झाल्यावर सौ. सिल्व्हिया यांचा भाव जागृत झाला, तर श्री. मॉरिसिओ कृतज्ञतेच्या स्थितीत होते. सौ. सिल्व्हिया गेली १० वर्षे ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या मार्गदर्शनानुसार साधना आणि सत्सेवा करत आहेत. त्यांना श्री. मॉरिसिओ यांचा पूर्ण पाठिंबा आहे. गियानाची पातळी घोषित झाल्यावर सत्संगाला उपस्थित असलेल्या तिच्या आजी सौ. सिल्व्हिया दत्तोली आणि मामा श्री. सर्हियो यांनासुद्धा पुष्कळ आनंद झाला.

२. या अनमोल सत्संगाला ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या ४ संतांची वंदनीय उपस्थिती लाभली.

३. गियानाच्या आध्यात्मिक पातळीची घोषणा झाल्यावर उपस्थित साधकांना पुष्कळ आनंद होणे आणि अनेक साधकांची भावजागृती होणे

या प्रसंगी आशिया, युरोप आणि उत्तर अन् दक्षिण अमेरिका या खंडांतील १० देशांमधील ५० साधक उपस्थित होते. सत्संगात काही साधक आणि त्यांच्या बालसाधक मुलांनी ‘ऑनलाईन’ येऊन सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. गियानाच्या आध्यात्मिक पातळीची अनपेक्षितपणे घोषणा झाल्यावर उपस्थित साधकांना पुष्कळ आनंद झाला. गियाना दक्षिण अमेरिका खंडातील बोलिव्हिया या देशाची रहिवासी आहे. त्यामुळे विशेषतः त्या खंडातील अनेक साधकांचा भाव जागृत झाला. काही साधकांनी ‘या घोषणेमुळे या भागातील साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीची आशा निर्माण झाली’, असे सांगून गियानासारखी बालिका लाभल्यामुळे साश्रू नयनांनी कृतज्ञता व्यक्त केली.

४. हा सत्संग पाऊण घंटा चालू होता. या कालावधीत चि. गियाना आनंदात होती आणि ‘तिच्या अस्तित्वाने वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवत होते.

कृतज्ञता !’

– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, (पू.) श्री. देयान ग्लेश्‍चिच आणि (पू.) सौ. भावना शिंदे (३.२.२०२१)

  • दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे फॉर्म्युले सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या फॉर्म्युल्याशी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना दैवी कण असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक