१. भाववृद्धी सत्संगाच्या वेळी कु. माधुरी दुसे यांनी सांगितलेले विविध भावप्रयोग
अ. ‘देवाने आपल्याला साक्षात् वैकुंठलोकात आणले आहे; म्हणून कृतज्ञता व्यक्त करून वैकुंंठलोकातील वातावरण अनुभवण्याचा प्रयत्न करूया.
आ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हात आपल्या डोक्यावर असून त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य कण शरीर आणि मन यांत जात आहेत. त्यामुळे माझा देह आणि मन यांची शुद्धी होत आहे’, असा भाव ठेवूया.
इ. परात्पर गुरुदेव प्रतिदिन ज्या तुळशीच्या रोपाला पाणी घालतात, त्या तुळशीच्या रोपात बसून आपण त्यांच्या कृपेची धार अनुभवूया.
ई. ‘भगवंत सर्वत्र असून तो मला सदैव साहाय्य करत आहे’, असा भाव ठेवूया.
उ. आपण लहान होऊन परात्पर गुरुदेवांच्या खोलीत जाऊन ‘भावपूर्ण नामजप कसा करू ?’, असे त्यांना विचारूया आणि तसे करण्याचा प्रयत्न करूया.
ऊ. ‘गुरुमाऊली आपल्या मनात गुणरूपी बीज टाकत आहे’, असा भाव ठेवूया.
ए. गुरुमाऊली सूक्ष्मातून आपल्या डोक्यावरून हात फिरवत आहे आणि त्यामुळे आपल्यातील सूक्ष्मातीसूक्ष्म स्वभावदोष अन् अहं नष्ट होत आहेत’, हे अनुभवूया.
ऐ. ‘गुरुमाऊलीचे चैतन्य सहस्रारचक्रातून आत जात आहे’, असे अनुभवण्याचा प्रयत्न करूया.
ओ. ‘गुरुमाऊलीच्या चरणांना स्पर्श करत आहे’, असा भाव ठेवून तो स्पर्श अनुभवण्याचा प्रयत्न करूया.
औ. गुरुमाऊलीला न्याहाळूया आणि त्यांची प्रीती अनुभवूया.
अं. गुरुमाऊलीच्या चरणी क्षमायाचना करूया.
क. ‘श्रीविष्णूने वामन अवतारात बळीराजाचा अहं नष्ट करण्यासाठी त्याचे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवले, तसा आपला अहं नष्ट होण्यासाठी गुरुदेवांचे चरण आपल्या मस्तकावर आहेत’, असेे अनुभवूया.
ख. ‘देवाचे आपल्याकडे अखंड लक्ष आहे’, असेे अनुभवूया.
ग. देवाला शरण जाऊन ‘मी असमर्थ आहे’, असे आत्मनिवेदन करूया.
घ. दत्तगुरूंचे स्मरण करून अखंड शिकण्याच्या स्थितीत रहाण्याचा आनंद अनुभवूया.
च. श्री लक्ष्मीदेवीचा सेवाभाव स्मरून तिच्यासारखे अखंड सेवारत रहाण्याचा प्रयत्न करूया.
छ. ‘गुरुमाऊलीच्या हाताला धरून आपण तिला ध्यानमंदिरात आणत आहोत’, असा भाव ठेवूया आणि ‘ध्यानमंदिरात आल्यावर गुरुमाऊली काय करते ?’, हे अनुभवूया.
ज. मारुतिरायांच्या गदेचे टोक प्रथम आज्ञाचक्रावर आणि नंतर अनाहतचक्रावर ठेवून प्रार्थना करूया.
झ. शिवाचे दर्शन घेऊन त्याच्या जटेतील गंगेच्या धारेमध्ये न्हाऊन निघूया.
ट. ‘श्वासाला नाम जोडून चैतन्य ग्रहण करत आहोत’, असे अनुभवूया.
ठ. ‘परात्पर गुरुदेवांचे हास्य अनुभवूया. त्यातील चैतन्य ग्रहण झाल्यामुळे आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असा भाव ठेवूया.
ड. स्वतःला विसरून देवाला शरण जाऊया.
ढ. ‘देवाने आतापर्यंत कसे सांभाळले ?’, ते स्मरून देवाच्या चरणी कृतज्ञताभाव अनुभवूया.
ण. परात्पर गुरुदेवांच्या दारातील पायपुसणे होऊया.
त. नामाचे तेल साधनारूपी दिव्यात घालून तो दिवा तेवत ठेवूया.
थ. आतापर्यंत साधनेसाठी झालेले प्रयत्न परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञतेने अर्पण करूया.
द. परात्पर गुरुदेवांच्या खोलीत मानसरित्या जाऊन चैतन्य अनुभवूया.
ध. देवाच्या चरणांशी बसून ‘कुठे न्यून पडतो ?’, याचे चिंतन करूया.
न. गुरुचरणांच्या स्मरणाने पेशीपेशीत चैतन्य जात असल्याचे अनुभवूया.
प. श्रीकृष्णाचे विराट रूप अनुभवूया.
फ. ‘देवाचे स्मरण कुठे कुठे होत नाही ?’, याचे चिंतन करून आत्मनिवेदन करूया.
ब. भगवंताच्या आगमनाची सिद्धता करूया.
भ. ‘गुरुमाऊलीचे बोट आज्ञाचक्रावर आहे आणि ते भावकणांच्या माध्यमातून स्वभावदोष अन् अहं यांच्याविरुद्ध लढण्यासाठी शक्ती देत आहेत’, असे अनुभवूया.
म. ‘अंतर्मनातील विचारांचा साठा गुरुस्मरणाच्या चैतन्याने नष्ट होत आहे’, असा भाव ठेवूया.
२. कु. माधुरी दुसे यांनी भाववृद्धी सत्संगात सांगितलेले काळाचे महत्त्व
अ. भूतकाळ म्हणजे माया; भविष्यकाळ म्हणजे स्वप्न आणि वर्तमानकाळ म्हणजे देव आहे !
आ. भूतकाळातून शिकावे, वर्तमानात सावरावे आणि भविष्यासाठी सज्ज असावे !
इ. भूतकाळ शिकण्यासाठी आहे, वर्तमानकाळ शिकलेले कृतीत आणण्यासाठी आहे आणि भविष्यकाळ चुका टाळण्यासाठी आहे !’
– श्रीमती जयश्री भालेराव, रायगड (मार्च २०१८)
|