सैन्यभरती घोटाळ्याच्या प्रकरणी ५ सैन्याधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

सैन्यभरतीत घोटाळा होणे म्हणजे अपात्र लोकांच्या हाती देशाची सुरक्षा सोपवण्यासारखे आहे. हा देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा प्रकार असल्यामुळे अशा घोटाळेबाजांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !

नवी देहली – सैन्यातील भरती घोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) लेफ्टनंट कर्नल दर्जाचे ५ अधिकारी, १२ अन्य कर्मचारी आणि ६ नागरिक यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. सीबीआयने देहलीतील सैन्य छावणीतील बेस रुग्णालयासह देशभरातील १३ शहरांतील ३० ठिकाणांवर छापे घातले, अशी माहिती सैन्याधिकार्‍याने दिली. गुन्हा नोंद करण्यात आलेल्यांमध्ये या घोटाळ्याचे सूत्रधार लेफ्टनंट कर्नल भगवान यांचा समावेश असल्याचेही या अधिकार्‍याने सांगितले.

नवी देहलीमध्ये बेस रुग्णालयामध्ये काही उमेदवारांना तात्पुरते अपात्र ठरवण्यात आले. त्यांची फेर वैद्यकीय चाचणी घेऊन उत्तीर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून लाच स्वीकारण्यात सैन्याचे काही विद्यमान अधिकारी अडकले असल्याची तक्रार ब्रिगेडिअर (दक्षता) व्ही.के. पुरोहित यांनी केली होती. तिच्या आधारे सीबीआयने ही कारवाई केली.