पैसे न दिल्याने पंप चालकांकडून इंधन देणे बंद !
अमरावती – मागील ८-१० मासांपासून पेट्रोल पंप चालकांचे पैसे न दिल्याने पंप चालकांनी पोलिसांना पेट्रोल-डिझेल देणे बंद केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील ३१ पोलीस ठाण्यांतील सरकारी पोलीस वाहने जागेवरच उभी आहेत. कोरोनाच्या संकटामुळे पंप चालकांची कोट्यवधी रुपयांची देयके थकित असल्याने पेट्रोल पंप चालकांनी इंधन देेणे बंद केले आहे, तर आवश्यकतेनुसार पोलिसांच्या वाहनांत डिझेल भरणे चालू असून पोलीस कर्मचारी स्वतःच्या व्ययाने वाहनांत डिझेल भरत आहेत. वाहने कामपुरती फिरवा. आपापल्या क्षेत्रांतच फिरा’, असे आदेश कर्मचार्यांना देण्यात आले आहेत.