पुणे, १३ मार्च – हजहाऊसला आक्षेप घेतल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी येथील हज हाऊसची बांधणी सिव्हिक आणि कल्चर सेंटरच्या नावाखाली करण्यात येत आहे, संबंधित जागा पुणे महापालिकेच्या नियंत्रणात आहे आणि अर्जदारही पोलीस अन्वेषणाला सहकार्य करत आहे, असे अर्जदारांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. तसेच या प्रकरणात पोलीस कोठडीतील चौकशीची आवश्यकता नाही, हेही त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले.
त्यानुसार न्यायालयाने समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन संमत करावा, असा युक्तीवाद अधिवक्ता एस्.के. जैन आणि अधिवक्ता अमोल डांगे यांनी केला. त्यानुसार मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन १२ मार्च या दिवशी न्यायालयाने संमत केला आहे. संभाजी ब्रिगेडने या प्रकरणी तक्रार दिली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने १५ सहस्र रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर एकबोटे यांना हा अटकपूर्व जामीन संमत केला आहे.