‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाचे वाचक आणि जिज्ञासू यांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय अन् त्यांना आलेल्या अनुभूती ! (सप्टेंबर २०२०)

१. वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

१ अ. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ फेसबूक (इंग्रजी)

१. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या सर्व ‘पोस्ट्स’ माझ्यासाठी पुष्कळ उपयुक्त आहेत. त्या वाचतांना मला छान वाटते. त्यासाठी कृतज्ञता !’ – श्रीमती मेघना के.एस्.

१ आ. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ इन्स्टाग्राम

१ आ १. सद्गुरु सिरियाक वाले यांनी सांगितलेले २ संदेश मला फार आवडले ! : ‘आम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना देवापर्यंत पोचते’ आणि ‘देव आमच्या मनातील प्रत्येक विचार जाणतो’, हे सद्गुरु सिरियाक वाले यांनी सांगितलेले २ संदेश मला फार आवडले. त्यामुळे ‘ईश्‍वराने आपल्या आयुष्यासाठी सर्वोत्तम नियोजन करून ठेवले आहे’, यावर विश्‍वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हा प्रभावी संदेश शेअर केल्याविषयी धन्यवाद !’ – श्रीमती प्रिसिला रोड्रिगेज

१ इ. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’लाईव्ह चॅट

१ इ १. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळावरील लेख मला पुष्कळ चित्तवेधक वाटले. मी एक भौतिकशास्त्रज्ञ आहे. ‘तुम्ही करत असलेल्या संशोधनासाठी तुमच्याकडे कोणती उपकरणे आहेत ?’, याविषयी मला जाणून घ्यायचे आहे.’ – श्री. हेक्टर, चिले

१ इ २. सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांविषयीचा लेख वाचल्यामुळे मला आपण करत असलेल्या कृतींमागील शास्त्र कळले ! : ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकांनी माझ्या शंकांचे समाधानकारक निरसन केल्याविषयी धन्यवाद ! सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांमधील भेद जाणून घेण्यासाठी दिलेल्या ‘लिंक’वरील लेख मी वाचले. त्या लेखांमुळे मला आपण करत असलेल्या कृतींमागील शास्त्रही कळले.’ – श्रीमती पूनम स्वामी, भारत

१ इ ३. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ अध्यात्माविषयी प्रामाणिकपणे आणि त्रुटींविरहित सांगत असलेली माहिती माहितीजालावर सापडणे दुर्मिळ आहे ! : ‘तुम्ही मला लक्षपूर्वक साहाय्य करत आहात’, त्यासाठी धन्यवाद ! अध्यात्माविषयीच्या चुकीच्या माहितीमुळे एखाद्याची दिशाभूल होण्याची शक्यता असते; मात्र ज्याप्रमाणे ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ अध्यात्माविषयीची माहिती प्रामाणिकपणे आणि त्रुटींविरहित सांगते, तशी माहिती माहितीजालावर (इंटरनेटवर) सापडणे दुर्मिळ आहे. देवाच्या साहाय्यानेच आपण आपला (आध्यात्मिक उन्नती करण्याचा) उद्देश पूर्ण करण्याकडे लक्ष देऊया.’ – श्री. डॅनियल, सर्बिया

१ ई. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’लॉग इन (भारत)

१ ई १. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ने दिलेल्या अध्यात्माविषयीच्या शास्त्रोक्त स्पष्टीकरणामुळे मला साधनेत पुष्कळ लाभ झाला असून माझे आयुष्य पालटले आहे ! : ‘मी एक वर्षापासून ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळावरील माहिती वाचत आहे, तसेच ‘यू ट्यूब’ या वाहिनीवर ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ घेत असलेल्या चर्चासत्रात मी सहभागी झालो आहे. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ने दिलेल्या शास्त्रोक्त स्पष्टीकरणामुळे मला पुष्कळ शिकायला मिळाले आणि माझ्या शंकांचे निरसन झाले. त्यामुळे त्याचा माझ्या साधनेत पुष्कळ लाभ झाला असून माझे आयुष्य पालटले आहे. तुमच्या गोवा येथील केंद्रात येऊन कृतज्ञता व्यक्त करण्याची माझी इच्छा आहे. ‘जगभरातील लोकांचे जीवन सकारात्मकदृष्ट्या पालटण्याचे उदात्त कार्य करण्यासाठी तुम्हा सर्वांना ईश्‍वराचा भरभरून आशीर्वाद लाभो’, ही प्रार्थना !’ – श्री. रश्मीकांत पांडे, वाराणसी, भारत.

२. आलेल्या अनुभूती

२ अ. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ फेसबूक (इंग्रजी)

२ अ १. ‘हाऊ टू रिमूव्ह निगेटिव्ह कव्हरिंग ? (त्रासदायक आवरण कसे काढावे ?)’ याविषयीच्या ‘वेबिनार’मध्ये सांगितल्याप्रमाणे नामजप केल्यावर ‘स्वतःला आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे लगेच जाणवणे : ‘सद्गुरु सिरियाक वाले यांच्या ‘हाऊ टू रिमूव्ह निगेटिव्ह कव्हरिंग ? (त्रासदायक आवरण कसे काढावे ?)’ याविषयीच्या ‘वेबिनार’मध्ये सांगितल्याप्रमाणे मी नामजप केला. त्या वेळी ‘स्वतःला आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे मला लगेच जाणवले, तसेच माझ्या मणिपूरचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवून मला पुष्कळ छान वाटले. आता मी प्रतिदिन हा नामजप करीन.’ – श्रीमती लॉरा ऍन एलिझाबेथ

२ अ २. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपांसहित नियमितपणे उपाय केल्याने पुष्कळ लाभ होणे अन् ‘चिंता करणे’ आणि ‘आत्मविश्‍वासाचा अभाव’ या स्वभावदोषांमध्ये सकारात्मक पालट होणे : ‘मी आता कुलदेवतेचा नामजप करणे थांबवले असून नियमितपणे ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करत आहे. त्या समवेत मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप आणि उपायही नियमितपणे करत आहे. यांचा मला पुष्कळ लाभ होत आहे. माझ्यातील ‘चिंता करणे’ आणि ‘आत्मविश्‍वासाचा अभाव’ या स्वभावदोषांमध्ये सकारात्मक पालट दिसून येत आहेत. ‘मी साधनेच्या योग्य मार्गावर आहे’, असे मला वाटते.’ – श्रीमती तृप्ती मेहता, मुंबई, भारत.

२ आ. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ लाईव्ह चॅट

१. ‘तुम्ही सविस्तरपणे दिलेली माहिती आणि आश्‍वासन यांसाठी धन्यवाद ! श्राद्धविधी करतांना मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केला आणि मला चांगले वाटले. येथून पुढे मी हा नामजप नियमितपणे करीन.’ – श्री. सेल्वी गॉफ, यू.के.

येथे प्रसिद्ध  करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक